भुसावळातील तरुणाचा नशिराबादमध्ये खून : तिसर्या आरोपीला अटक
भुसावळातील तरुणाचा पूर्व वैमनस्यातून नशिराबादमध्ये झाला होता खून : अन्य दोघा आरोपींना आज न्यायालयात हजर करणार
भुसावळ : भुसावळातील तरुणाचा पूर्व वैमनस्यातून नशिराबाद येथे खून झाल्याची घटना मंगळवार, 21 रोजी सायंकाळी घडली होती. या प्रकरणी दोन आरोपींना गुन्हा घडल्यानंतर अवघ्या काही तासात अटक करण्यात आली होती. या गुन्ह्यात आणखी आरोपी असल्याचा संशय असल्याने पोलिसांनी भुसावळ ते जळगाव महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर आरोपींसोबत आणखी एक संशयीत असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर एका संशयीताला शनिवारी रात्री अटक करण्यात आली. आवेज बिस्मिल्ला शेख (20, झिया कॉलनी, नवी ईदगाजवळ, भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. दरम्यान, संशयीताला रविवारी न्यायालयात हजर केले असता 29 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
पूर्व वैमनस्यातून भुसावळातील तरुणाची झाली होती हत्या
भुसावळात गतवर्षी 18 ऑक्टोबर 2020 रोजी संशयीत धम्मप्रियसह अन्य पाच आरोपींनी मो.कैफ (17) या तरुणाची हत्या केली होती. भावाची हत्या करणार्यांचा सूड घेण्यासाठी संशयीत तथा मयताचा भाऊ शेख समीर शेख जाकीर (21, पंचशील नगर, भुसावळ) व शेख रेहान शेख नईम (22, पंचशील नगर, भुसावळ) यांनी धम्मप्रिय मनोहर सुरळकर (19, पंचशील नगर, भुसावळ) या तरुणाची 21 रोजी जळगाव कारागृहातून जामिनावर सुटका झाल्यानंतर नशिराबाद उड्डाणपुलाखाली गोळीबार करून तसेच चाकूचे वार करून हत्या केली होती. खुनाच्या घटनेनंतर अवघ्या काही तासात दोघा आरोपींना अटक करण्यात नशिराबाद पोलिसांना यश आले होते.
तिसरा आरोपीही जाळ्यात
खून प्रकरणात आणखी आरोपी असावेत? असा संशय पोलीस प्रशासनाला असल्याने पोलिसांनी भुसावळ-जळगाव व जळगाव-नशिराबाद महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केल्यानंतर संशयीताबरोबर आणखी एक संशयीत असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी संशयीताची ओळख पटवत त्यास शनिवारी रात्री अटक केली. आवेज बिस्मिल्ला शेख (20, झिया कॉलनी, नवी ईदगाजवळ, भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. भुसावळ पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली नशिराबादचे सहा.निरीक्षक अनिल मोरे व सहकार्यांनी ही कारवाई केली.
तीनही आरोपींची पोलीस कोठडीत रवानगी
धम्मप्रिय सुरळकर या तरुणाच्या खून प्रकरणी सुरूवातीला शेख समीर शेख जाकीर (21, पंचशील नगर, भुसावळ) व शेख रेहान शेख नईम (22, पंचशील नगर, भुसावळ) या संशयीताना अटक केल्यानंतर न्यायालयाने त्यांना 27 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती तर आवेज बिस्मिल्ला शेख (20, झिया कॉलनी, नवी ईदगाजवळ, भुसावळ) या तरुणाच्या अटकेनंतर अटकेतील आरोपींची संख्या तीन झाली आहे. आवेज शेख या तरुणाला अटक केल्यानंतर जळगाव न्यायालयात हजर केले असता 29 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, खुनातील दोघा संशयीतांकडून पोलिसांनी आतापर्यंत गावठी कट्टा, मॅग्झीन व दोन धारदार चाकू जप्त केले आहेत.