भुसावळ- शहरातील 32 खोली भागातील तरुणाचा पिंप्रीसेकम शिवारात साकरी नदीच्या पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाला. मो.आदिल रीजवान अश्रफ अन्सारी (वय 17.5, रा. भुसावळ) असे मयताचे नाव आहे. मयत मो.आदिलसह चार ते पाच मित्र पाण्यात पोहण्यासाठी सोमवारी सकाळी गेले होते. पाण्याचा अंदाज न आल्याने या तरुणाचा मृत्यू झाला. या प्रकरणी तालुका पोलिसात अश्रफ हबीमुल्ला अन्सारी (48, रा.32 खोली, भुसावळ) यांनी खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास एएसआय नजीर काझी करीत आहेत.