भुसावळातील तरुणाची आत्महत्या

0

भुसावळ- शहरातील वेडीमाता मंदिर परीसरातील 27 वर्षीय अविवाहित तरुणाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची बुधवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. संदीप अरविंद बेलदार (27) असे मृत तरुणाचे नाव आहे. कुटुंबातील सदस्य कामानिमित्त बाहेर पडल्याने संदीपने गळफास घेतल्याचे सांगण्यात आले. शहर पोलिसांना याबाबत माहिती कळवण्यात आल्यानंतर त्यांनी धाव घेत पंचनामा केला तर मृतदेह वरणगाव येथे शवविच्छेदनासाठी हलवण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.