भुसावळ : भुसावळातील तरुणाचा पूर्व वैमनस्यातून नशिराबाद येथे खून झाल्याची घटना मंगळवार, 21 रोजी सायंकाळी घडली होती. या प्रकरणी दोन आरोपींना गुन्हा घडल्यानंतर अवघ्या काही तासात अटक करण्यात आली होती. या गुन्ह्यात आणखी आरोपी असल्याचा संशय असल्याने पोलिसांनी भुसावळ ते जळगाव महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर आरोपीसोबत आणखी एक संशयीत असल्याचे निष्पन्न केल्यानंतर संशयीताला शनिवारी रात्री अटक करण्यात आली. आवेज बिस्मिल्ला मणियार (20, भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
तिसरा आरोपीही जाळ्यात
खून प्रकरणात आणखी आरोपी असावेत? असा संशय पोलीस प्रशासनाला असल्याने पोलिसांनी भुसावळ-जळगाव व जळगाव-नशिराबाद महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केल्यानंतर संशयीताबरोबर आणखी एक संशयीत असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी संशयीताची ओळख पटवत त्यास शनिवारी रात्री अटक केली. आवेज बिस्मिल्ला मणियार (20, भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. भुसावळ पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली नशिराबादचे सहा.निरीक्षक अनिल मोरे व सहकार्यांनी ही कारवाई केली.