भुसावळ– बसस्थानकाजवळील जुन्या पालिकेच्या विहिरीत नैराश्यातून एका तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केला मात्र यावेळी उपस्थित असलेल्या एका इसमाने सतर्कता दाखवत या तरुणाला वेळीच बाहेर काढल्याने त्याचे प्राण वाचले. बुधवारी दुपारी 12.15 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. एसटीडी व झेरॉक्स सेंटर चालक गजानन उर्फ गजू चौधरी (40) या तरुणाने कौटुंबिक कारणातून आलेल्या नैराश्यातून पालिकेच्या विहिरीत उडी घेतली मात्र याचवेळी प्रसंगावधान दाखवत सय्यद सुलतान सय्यद कबीर यांनी विहिरीत उडी घेत गजू यास बाहेर काढले. या घटनेनंतर बाजारपेठ पोलिसांनी धाव घेत माहिती जाणून घेतली मात्र त्याबाबत नोंद नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
प्रभारी नगराध्यक्षांनी केला गौरव
जुन्या पालिकेत बुधवारी रोजगार कौशल्य मेळावा सुरू असतानाच ही घटना घडल्यानंतर तरुणाचे प्राण वाचवणार्या सय्यद कबीर यांचा प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी यांनी गौरव केला. प्रसंगी माजी नगरसेवक राजेंद्र आवटे, राजू सूर्यवंशी, पत्रकार राकेश कोल्हे, नमा भाई शर्मा उपस्थित होते.