भुसावळ : रेल्वेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून नंतर ओळख वाढवून विवाह करेल, अशी बतावणी करून शहरातील 29 वर्षीय युवतीवर बलात्कार करण्यात आला मात्र नंतर विवाहाला नकार दिल्यानंतर सावदा येथील रेल्वे स्टेशन प्रबंधक अंकुश किरण मोरे (रा.गणेश कॉलनी, मरीमाता मंदीरामागे, भुसावळ) याच्याविरूध्द रविवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपीला रात्री उशिरा शहर पोलिसांना अटक केल्यानंतर सोमवारी भुसावळ न्यायालयात हजर केले असता त्यास 13 पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
आरोपीला पोलिसांकडून मध्यरात्रीच अटक
शहरातील 29 वर्षीय युवतीने रविवारी शहर पोलिस ठाण्यात आरोपीविरोधात अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल केला होता. लग्नात ओळख झाल्यानंतर आरोपीने सलग वाढवत मैत्री निर्माण करीत रेल्वेत नोकरीचे आमिष दाखवले तसेच विवाह करण्याचे आश्वासन दिले मात्र ते पाळल्याने आरोपीविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस उपनिरीक्षक अंबादास पाथरवट करीत आहे.