भुसावळ- शहरातील तलाठी कार्यलयातील दप्तराची तपासणी जिल्हाधिकारी कार्यालयातील पथकाने सलग दोन दिवस केल्याने महसूल वर्तुळात मोठी खळबळ उडाली. तपासणी अहवाल जिल्हाधिकारी यांना सादर केला जाणार आहे. तपासणीत काय आढळले? याबाबत माहिती देण्यास पथकाने नकार दिला. तलाठी एन.आर.ठाकूर यांच्या निलंबनानंतर त्यांच्या कार्यकाळातील तलाठी कार्यालयात झालेल्या नोंदी तपासण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले होते. त्यानुसार मंगळवार व बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील सहायक लेखाधिकारी नितीन उंबरकर, रोजगार हमी योजनेते सहायक लेखाधिकारी हेमंत ठाकूर, उपलेखापाल व्ही.डी. पाटील, रवींद्र म्हसकर यांनी दप्तराची तपासणी केली.