भुसावळ- शहरातील ताप्ती पब्लिक इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये 4 रोजी फॅन्सी ड्रेस स्पर्धा घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा साकारत लक्ष वेधले. नर्सरी, ज्युनियर केजी व सिनीयर केजीच्या विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग नोंदवला. शाळेतील तब्बल 300 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ, महात्मा गांधीजी, सुभाषचंद्र बॉस, भगतसिंग, झाशी की राणी, सावित्रीबाई फुले, प्रतिभाताई पाटील, लोकमान्य टिळक, इंदिरा गांधी, नरेंद्र मोदी, स्वामी विवेकानंद, मिल्ट्रीमॅन यासारखे विविध रुपातील वेशभूषा विद्यार्थ्यांनी साकारल्या. पालकांनी टाळ्यांचा कडकडाट करीत विद्यार्थ्यांचे मनोबत वाढवले. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून वर्षा काळे व सोनाली मुजूमदार यांनी काम पाहिले. स्पर्धेतील गुणवंतांना वार्षिक पारीतोषिक वितरण कार्यक्रमात गौरवण्यात येणार आहे. भारती मेढे, मार्गारेट सिंग, सॅनटेन लेमोस, मिशेल अँथोनी, पौर्णिमा चौधरी, क्रिस्टीना साबळे, मंदा बंटे, स्मिता नन्नावरे, वंदना मेढे, कविता सपकाळे, बर्नाडेट रॉस, अनघा शिंदे, वेर्जीनिया बर्नाड, मोती मेरी जॉन, खुशबू अग्रवाल, विद्या साळुंके, स्मिता जाधव उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वीतेसाठी दीपक चौधरी, पुष्कर वायकोळे, भूषण पाटील, सचिन पारधी यांनी परीश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन खुशबू अग्रवाल तर आभार भारती मेढे यांनी मानले.