भुसावळातील ‘त्या’बालिकेला ‘कोरोना’चा संसर्ग नाही

0

अधिष्ठाता यांनी घेतली परिचारिकांची बैठक

जळगाव: भुसावळ येथील एका 12 वर्षीय बालिकेला कोरोना विषाणूची लागण झाल्याचा संशय स्थनिक डॉक्टरांनी व्यक्त करत त्या बालिकेला गुरुवारी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सदर बालिकेला कोरोनाचा संसर्ग झाला नसल्याचे रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले. मात्र खबरदारी म्हणून परिचारिका तसेच इतर कर्मचार्‍यांनी दिवसभर मास्क लावून कामकाज केले.

गुरुवारी रात्री भुसावळ येथील एक 12 वर्षीय बालिकेला कोरोना संसर्ग झाल्याचा संशय भुसावळ शरातील स्थानिक डॉक्टराने व्यक्त केला होता. या संशयावरुन रुग्णाला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. येथे वैद्यकीय अधिकार्‍यांनी बालिकेची तपासणी केली असता कोरोना आजाराची लक्षण नसल्याचे स्पष्ट केले आहे.

सर्वत्र कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असून महाराष्ट्रातही याचे रुग्ण आढळून आले आहे. त्याच पर्श्वभुमिवर शुक्रवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांनी रुग्णालयातील अधिपरिचारिका यांची बैठक घेत कोरोना आजाराची समस्या लक्षात घेता उपाययोजने संदर्भात अवश्यक त्या सुचना देत रुग्णालयातील कोरोना कक्ष व इतर उपाययोजनेची माहिती घेतली.

कर्मचार्‍यांचे मास्क लावून काम

कोरोना व्हायरसचे भिती लक्षात घेता जिल्हा सामान्य रुग्णालयातील परिसारिकांसह इतर विभागातील कर्मचारी, सुरक्षा रक्षक तसेच रुग्णालयातील पोलीस चौकीतील पोलीस कर्मचारी देखील मास्क लावून कामकाज करतांन दिसून आले. यावर काहींनी खबरदारी म्हणून मास्क लावल्याचे सांगितले तर काहींनी वार्डात काम करीत असतांना आपण नेहमीच मास्क लावत असल्याचे सांगितले.