भुसावळातील ‘त्या’ अनोळखीचा ब्रेन हॅमरेजने मृत्यू

भुसावळ : शहरातील रेल्वे लाईनीच्या बाजूला शनिवारी सापडलेल्या अनोळखी व्यक्तीची अद्यापही ओळख पटलेली नाही तर शवविच्छेदन अहवाला मयताचा मृत्यू हा ब्रेन हॅमरेजने झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

शवविच्छेदन अहवालातून खून न झाल्याचे स्पष्ट
शनिवारी टिंबर मार्केटजवळील बोगद्याजवळ रेल्वे लाईनीच्या बाजूला 35 वर्षीय अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला. सोमवारी सायंकाळी सहा वाजता ट्रामा केअर सेंटरमध्ये डॉ.मयूर चौधरी, डॉ.शिवाजी गवळी, डॉ.उमेश मुकंद यांच्या पथकाने मृतदेहाचे विच्छेदन केले. पंकज कोलते यांनी सहकार्य केले.