भुसावळातील ‘त्या’ सेवानिवृत्त रेल्वे कर्मचार्‍यासह कुटुंबीयांचा अहवाल निगेटीव्ह

0

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पसरली होती भीती : यंत्रणेनेही घेतला सुटकेचा श्‍वास

भुसावळ : पत्नीसोबत ऑस्ट्रेलिया भ्रमणासाठी गेलेल्या रेल्वेतील सेवानिवृत्त लोकोपायलटचा शुक्रवारी हृदयविकाराने मृत्यू झाला होता मात्र या रुग्णाची हिस्ट्री परदेशावरून पुणे व पुणे ते भुसावळ असल्याने कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाने अत्यंत दक्षता घेत मृतासह त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना शुक्रवारी रात्रीच जळगावात तपासणीसाठी रवाना केले होते. या रुग्णाच्या अहवालाबाबत सार्‍यांनाच प्रतीक्षा असताना रविवारी रात्री या रुग्णासह त्यांच्या नातेवाईकांचा अहवाल निगेटीव्ह आल्याने यंत्रणेसह भुसावळकरांना मोठाच दिलासा मिळाला आहे. मयतासह कुटुंबियांचा अहवाल निगेटीव्ह आल्याच्या वृत्ताला पालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.किर्ती फलटणकर यांनी दुजोरा दिला.

जळगावनंतर भुसावळात पसरली होती भीती
जळगावच्या मेहरूणमधील एका रुग्णाचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली होती तर भुसावळातील रेल्वे विभागातील सेवानिवृत्त लोकोपायलटचाही शुक्रवारी रात्री हृदयविकाराने मृत्यू ओढवला होता मात्र या रुग्णाची हिस्ट्री पाहता प्रशासनाने खबरदारी म्हणून या रुग्णासह त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची वैद्यकीय चाचणीही केली होती मात्र सुदैवाने या रुग्णासह त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची चाचणीचे अहवाल निगेटीव्ह आल्याने भुसावळकरांसह यंत्रणेलाही मोठा दिलासा मिळाला आहे.