प्रांताधिकार्यांचे आदेश ; जिल्ह्यात वास्तव्यास बंदी
भुसावळ- सामाजिक शांततेला अडसर ठरू पाहणार्या दोन गुन्हेगारांना प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांनी दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. या आदेशाने गुन्हेगारांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. शम्मी प्रल्हाद चावरीया (28, रा.वाल्मीक नगर, भुसावळ) व श्यामल शशीकांत सपकाळे (25, कोळी वाडा, भुसावळ) अशी हद्दपार झालेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांकडून आदेशाची अंमलबजावणी
जबरी चोरी, चोरी, लूट तसेच हल्ल्याप्रकरणी दाखल विविध गुन्ह्यांमुळे शम्मी चावरीया व श्यामल सपकाळे यांना हद्दपार करण्यासंदर्भात बाजारपेठ व शहर पोलिसांकडून प्रस्ताव पाठवण्यात आले होते. या प्रकरणांची नुकतीच सुनावणी पूर्ण झाल्यानंतर दोघाही आरोपींना जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्याचे आदेश 24 रोजी प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांना काढल्यानंतर दोन्ही पोलिस ठाण्यांनी आदेशाची अंमलबजावणी केल्याचे पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड यांनी सांगितले.