आठ नामांकीत कंपन्यांमध्ये 425 विद्यार्थ्यांनी दिल्या मुलाखती
भुसावळ- भुसावळ कला, विज्ञान आणि पु.ओ.नाहाटा वाणिज्य महाविद्यालय व जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रांच्या संयुक्त विद्यमानाने वाणिज्य व व्यवस्थापन विभागातर्फे मंगळवारी महाविद्यालयाच्या आवारात पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा घेण्यात आला. यात आठ नामांकीत कंपन्यांकडे 425 विद्यार्थ्यांनी मुलाखती दिल्या तर लवकरच अनेकांना या कंपन्यांमध्ये नोकरीची संधी मिळण्याची शक्यता आहे.
यांची होती उपस्थिती
मेळाव्याप्रसंगी जिल्हा कौ. वि. केंद्राच्या सहायक आयुक्त अनिसा तडवी, ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.मोहन फालक, चेअरमन महेश फालक, सचिव विष्णू चौधरी, प्राचार्या डॉ.मीनाक्षी वायकोळे, उपप्राचार्य डॉ.एस.व्ही.पाटील, उपप्राचार्य डॉ.बी.एच.बर्हाटे, उपप्राचार्य डॉ.ए.डी.गोस्वामी, उपप्राचार्य डॉ.एन.ई.भंगाळे, वाणिज्य व व्यवस्थापन विभाग प्रमुख प्रा.व्ही.जी. कोचुरे आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती. उपप्राचार्य डॉ. एन.ई. भंगाळे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. या कार्यक्रमात वाणिज्य व व्यवस्थापन विभागातर्फे आयोजित ’वाणिज्य प्रश्न मंजुषा स्पर्धा 2018-19 आणि 2019-20 च्या विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिस वितरण करण्यात आले. सूत्रसंचालन डॉ. ममताबेन पाटील तर प्रा.व्ही.जी.कोचुरे यांनी आभार मानले.
425 विद्यार्थ्यांनी दिल्या मुलाखती
या मेळाव्यात युरेका फोर्ब्स, नवभारत फर्टीलाझर्स, नवकिसान बायो. प्लॅनटेक लि., शोध अॅडव्हर्टिजमेंट अॅण्ड टेक्नॉलॉजी, मानराज मोटर्स, धूत ट्रान्समिशन, सिद्धवेद इन्फोटेक, मयुरेश्वर गारमेंट्स आदी आठ कंपन्यांमध्ये 425 विद्यार्थ्यानी मुलाखती दिल्या. लवकरच यातून काही विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध होणार आहे. कार्यक्रमासाठी जिल्हा कौशल्य विकास विभागाचे अधिकारी सुरेश पाटील, एम.बी.देशपांडे, अण्णासाहेब पाटील महामंडळाचे दीपक बोरसे यांचे सहकार्य लाभले. मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी प्रा.के.पी.पाटील, डॉ.रश्मी शर्मा, प्रा.स्मिता बेंडाळे, प्रा.भूषण चौधरी, प्रा.वर्षा पाटील, प्रा.स्वाती शेळके, प्रा.प्रियंका वारके, प्रा.सपना कोल्हे, प्रा.जयश्री चौधरी, प्रा.खिलेश पाटील, प्रा.हेमंत सावकारे, प्रा.श्याम बनसोड, बापू वारके यांनी परीश्रम घेतले.