भुसावळातील नाहाटा महाविद्यालयात भूगोल सप्ताहाला सुरूवात

0

भुसावळ- कला, विज्ञान आणि पु. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात भूगोलशास्त्र मंडळ आणि तालुका विधी सेवा प्राधिकरण भुसावळ यांच्या संयुक्त विद्यमाने भूगोल सप्ताह 16 ते 23 जानेवारी या कालावधीत होत आहे. वरील दररोज सकाळी 10 वाजता ‘कायद्यात तर फायद्यात’ या विषयावर विविध व्याख्याने आयोजित करण्यात आलेली आहे. 16 जानेवारी रोजी कै.उपप्राचार्य प्रा.सी.सी.कोल्हे स्मृती दिवस व भूगोल सप्ताहाचे उद्घाटन वरीष्ठ स्तर दिवाणी न्या.आर.आर.अहिर करतील. याप्रसंगी मार्गदर्शक म्हणून कनिष्ठ स्तर दिवाणी न्या. डी.एम.शिंदे मार्गदर्शन करतील. अध्यक्षस्थानी महाविद्यालायाच्या प्राचार्य डॉ.एम.व्ही.वायकोळे या असतील.

व्याख्यानांची मेजवाणी
शुक्रवार, 17 जानेवारी रोजी मोटर वाहन कायदा, मानसिक आरोग्य कायदा या विषयावर अ‍ॅड.संजय चौधरी व अ‍ॅड.मतीन अहमद यांचे व्याख्यान होणार आहे. शनिवार, 18 जानेवारी रोजी लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा, गर्भधारणा पूर्व आणि जन्मपूर्व लिंग निदान प्रतिबंध कायदा याविषयावर अ‍ॅड.प्रफुल्ल पाटील, अ‍ॅड. जया झोरे यांचे व्याख्यान होईल. रविवार, 19 जानेवारी रोजी विद्यार्थी सेमिनार व गटचर्चा होईल. सेमिनार व गटचर्चा प्रा. व्ही. पी. लढे, प्रा. प्रशांत पाटील , प्रा. अजय तायडे, प्रा. मिनाक्षी बेदरकर, प्रा. अनिल हिवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडेल. सोमवार, 20 जानेवारी रोजी ‘सायबर क्राईम’ या विषयावर अ‍ॅड.प्रकाश साळशिंगीकर, मुंबई यांचे व्याख्यान होणार आहे. मंगळवार, 21 जानेवारी रोजी पर्यावरण संरक्षण कायदा, प्राणी संरक्षण कायदा या विषयावर अ‍ॅड.विजय तायडे, अ‍ॅड.धीरज शंकपाळ यांचे व्याख्यान होईल. बुधवार, 22 जानेवारी रोजी माहिती अधिकार कायदा या विषयावर अ‍ॅड.सुनील पगारे यांचे व्याख्यान होईल तसेच याचवेळी विशेष कार्यक्रम पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार, 23 जानेवारी रोजी बक्षीस वितरण व भूगोल सप्ताह समारोप होईल. प्रसंगी वरीष्ठ स्तर दिवाणी न्या.एम.पी.बिहारे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. मार्गदर्शक म्हणून वरीष्ठ स्तर दिवाणी न्या.व्ही.जी.चौखंडे हे ‘न्यायालयीन प्रक्रिया व वैकल्पीक वाद निवारण पद्धती’ या विषयावर मार्गर्शन करतील. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालायाच्या प्राचार्य डॉ.एम.व्ही. वायकोळे या असतील.

यांचे सप्ताह यशस्वीतेसाठी परीश्रम
सप्ताह यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ.मीनाक्षी वायकोळे, उपप्राचार्य डॉ.एस.व्ही. पाटील, उपप्राचार्य डॉ.बी.एच.बर्‍हाटे, उपप्राचार्य डॉ.ए.डी.गोस्वामी, उपप्राचार्य डॉ.एन.ई.भंगाळे यांच्या मार्गदर्शनाखाली विभाग प्रमुख प्रा.व्ही.पी. लढे, भूगोल सप्ताह समन्वयक प्रा.अनिल हिवाळे, प्रा.प्रशांत पाटील, प्रा.अजय तायडे, प्रा.मीनाक्षी बेदरकर, प्रवीण पवार, विद्यार्थी सचिव शुभम सपकाळे परीश्रम घेत आहेत. हा संपूर्ण भूगोल सप्ताहाचा कार्यक्रम महाविद्यालयातील कला, वाणिज्य व विज्ञान विभागातील विद्यार्थ्यांसाठी आणि प्राध्यापकांसाठी तसेच भुसावळ परीसरातील नागरीकांसाठी खुला आहे. या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.पी.डोरले, प्राचार्य डॉ.मीनाक्षी वायकोळे, विभाग प्रमुख प्रा.व्ही.पी.लढे, सप्ताह समन्वयक प्रा. अनिल हिवाळे यांनी केले आहे.