भुसावळ : भुसावळ कला, विज्ञान आणि पु.ओं.नाहाटा वाणिज्य महाविद्यातील आयक्यूसी व संगणकशास्त्र विभागातर्फे शिक्षकांसाठी दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन 16 व 17 रोजी करण्यात आले. लर्निंग मॅनेजमेंटच्या अंतर्गत ऑनलाईन नॅशनल लेव्हलच्या ऑनलाईन वर्कशॉपचे उद्घाटन ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.मोहन फालक व प्राचार्य डॉ.मीनाक्षी वायकोळे, उपप्राचार्य व आयक्यूसी समन्वयक व संगणकशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. बी. एच. बर्हाटे यांनी उद्घाटन केले.
चार सत्रात झाली कार्यशाळा
ही कार्यशाळा एकूण चार सत्रात झाली. पहिल्या दिवशी पहिल्या सत्रात उपप्राचार्य प्रा.डॉ.बी.एच.बर्हाटे उपप्राचार्य यांनी एलएमएस या विषयावर मॉडल सॉप्टवेअरची माहिती दिली तर दुसर्या सत्रामध्ये प्रा.डॉ.गौरी एम. पाटील यांनी पॉवर पॉईंट तयार करण्याविषयी माहिती दिली. दुसर्या दिवशी तिसर्या सत्रात एनसीव्हीपीज शिरीष मधुकरराव चौधरी कॉलेजच्या संगणकशास्र विभागप्रमुख प्रा.प्रियांका बर्हाटे यांनी गुगल फार्म अॅण्ड गुगल क्लास रूम एलएमएस विषयी उपयुक्त मार्गदर्शन केले व चौथ्या सत्रात प्रा.डॉ.जी.आर.वाणी. यांनी व्हिडिओ कंटेंट डेव्हलपमेंट या विषयावर माहिती दिली. या कार्यशाळेत सुमारे 350 शिक्षकांनी ऑनलाईन सहभाग नोंदविला होता. ही कार्यशाळा टेक्नीकल नॉलेजसाठी उपयुक्त ठरली, असे सहभागी प्राध्यापकांनी सांगितले. सर्व सहभागी प्राध्यापकांना ई प्रमाणपत्र देण्यात आले.
यांनी घेतले परीश्रम
या कार्यशाळेसाठी संयोजक म्हणून प्रा.डॉ.बी.एच.बर्हाटे व कार्यशाळेचे सचिव म्हणून प्रा.हर्षल वि.पाटील यांनी काम बघितले तसेच संगणकशास्र विभागातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परीश्रम घेतले.