भुसावळातील परवाना रद्द झालेल्या स्वस्त धान्य दुकानातील लाभार्थींची पर्यायी व्यवस्था

0

स्वस्त धान्य दुकान क्रमांक दहामधून मिळणार धान्य : शिवसेना तालुका संघटक प्रा.धीरज पाटील यांच्या मागणीची दखल

भुसावळ : जळगाव रोड परीसरातील कडू प्लॉट भागातील दुकान क्रमांक 12 या दुकानाचा परवाना जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सुर्यवंशी यांनी रद्द केल्यानंतर प्रशासनाने या लाभार्थींनी त्वरीत त्याच भागातील अन्य दुकानामध्ये धान्य वितरीत करावेख, अशी मागणी शिवसेना तालुका संघटक प्रा.धीरज पाटील यांनी पुरवठा अधिकारी अतुल नागरगोजे यांच्याकडे केली होती. ही मागणी मान्य करीत तहसील प्रशासनाने टेक्निकल हायस्कूलमागील श्रमिक सेवा संघ दुकान नंबर 10 मध्ये ग्राहकांची तात्पुरती सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

वाढीव संचारबंदीत ग्राहकांना दिलासा : प्रा.धीरज पाटील
संचारबंदीचा काळ वाढल्याने नागरीकांच्या चिंता वाढल्या आहेत. रेशन दुकानावर श्रीनगर, गणेश कॉलनी, जुना सातारा, भिरुड कॉलनी, कोळी वाडा, भोई नगर, हुडको कॉलनी परिसरातील उर्वरीत कार्डधारकांना एप्रिल महिन्याचे धान्य नियमित दरानुसार विक्री करण्यात येणार आहे. या महिन्याचे मोफत धान्य 16 एप्रिलनंतर देण्यात येणार असून त्यामध्ये कार्डधारकांना पाच किलो अतिरिक्त तांदूळ मोफत देण्यात येईल. धान्य वितरणाबाबत दुकानदारासोबत चर्चा झाली असून ग्राहकांना दिलासा मिळणार असल्याचे प्रा.धीरज पाटील यांनी सांगितले.