भुसावळातील पालिका हद्दीबाहेरील रस्ते टाकणार कात
आमदार संजय सावकारे यांच्या पाठपुराव्याने एक कोटींचा निधी मंजूर
भुसावळ : शहराला लागून असलेल्या मात्र पालिका हद्दीबाहेरील रस्त्यांसाठी एक कोटींचा निधी आमदार संजय सावकारे यांच्या पाठपुराव्यानंतर मंजूर करण्यात आला आहे. लोकप्रतिनिधींनी सूचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत मुलभुत सुविधा पुरविणे या योजनेतंर्गत सन 2021-22 साठी साकेगाव शिवारात येणार्या शहरातील हद्दीबाहेरील चार रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी हा निधी मंजूर झाला असून लवकरच रस्ते कात टाकणार असल्याने समाधान व्यक्त होत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून होणार कामे
ग्रामीण भागातील गावांतर्गत मुलभूत सुविधा पुरविणे या योजनेतंर्गत 2021 -2022 साठी आमदार संजय सावकारे यांनी रस्ता डांबरीकरणाची कामे सूचवली होती. शासनाने यातील एक कोटींच्या निधीतून साकेगाव शिवारात येणार्या पालिका हद्दबाहेरील चार रस्त्यांच्या कामांना मंजूरी दिली. त्यात गोदावरी नगरातील रस्ते डांबरीकरण करणे 20 लाख, मोरेश्वरनगर सुभाष कॉलनी, राधाकृष्ण रेसीडेन्सी परीसर, रस्ते डांबरीकरण करणे 20 लाख रुपये, भाग्यश्री विहार, मोहितनगर, भिरुड कॉलनी, टोकेनगर रस्ते डांबरीकरण करणे 30 लाख रुपये, वरदविनायक नगर, महालक्ष्मी नगर, स्वरुप कॉलनी रस्ते डांबरीकरण करणे 30 लाख रुपये असा एक कोटींचा निधी मंजूर झाला आहे. ही कामे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून होणार असल्याने निविदा प्रक्रियेनंतर निर्धारीत वेळेत पूर्ण होणार आहेत.
लवकरच रस्ते टाकणार कात : आमदार
राज्य शासनाच्या ग्रामीण भागातील गावांतर्गत मुलभूत सुविधा पुरविणे या योजनेतंर्गत ही कामे होण्याचे सूचविले होते. या कामांना मंजुरी मिळाल्याने आता आगामी काळात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून निविदा प्रक्रिया राबवून ही कामे केली जाणार असल्याने वाहनधारकांसह नागरीकांना मोठा दिलासा मिळेल, असे आमदार संजय सावकारे म्हणाले. पालिका हद्दीबाहेरील साकेगाव शिवारात येणार्या चार भागांतील रस्त्यांची स्थिती बिकट असल्याने नागरीकांनी याबाबत आपल्याकडे तक्रारीही केल्या होत्या, असेही आमदार म्हणाले.