भुसावळातील पुन्हा एकाची दोन वर्षांसाठी हद्दपारी

0

भुसावळ- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील उपद्रवींना हद्दपार करण्यासंदर्भात शहर व बाजारपेठ पोलिसांनी प्रस्ताव सादर केले होते. या प्रस्तावावर चौकशी होवून शुक्रवारी सायंकाळी प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांनी गोया उर्फ अलियास समाधान निकम (32, आगवाली चाळ, भुसावळ) यास जळगाव जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार केले आहे. शनिवारी या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. यापूर्वीदेखील काही गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्या उपद्रवींना जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे तर शुक्रवादेखील एकास हद्दपार करण्यात आल्याने गुन्हेगारांमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान, शनिवारी प्रांताधिकार्‍यांच्या आदेशाची शनिवारी अंमलबजावणी केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.