भुसावळातील पूजार्‍याच्या खून प्रकरणी संशयीताला 10 महिन्यानंतर जामीन

0

भुसावळ- शहरातील हनुमान नगराजवळील हनुमान मंदिराच्या ओट्यावर विजय लक्ष्मण ठाकूर (45, हनुमानवाडी, भुसावळ) या मनोरुग्ण मात्र मंदिराची स्वच्छता करून व गाणी म्हणून उदरनिर्वाह करणार्‍या ईसमाचा खून झाला होता. खुनाच्या गुन्ह्याचा उलगडा करण्यास तब्बत 28 दिवसांचा कालावधी लागला होता तर या गुन्ह्यात विजय उर्फ राणा दिलीप चव्हाण (18, शनी मंदिरासमोर, साई डेअरीजवळ, भुसावळ) व मंगेश अंबादास काळे (18, कृष्णा नगर, भुसावळ) यांना अटक करण्यात आली होती. एका आरोपीस अटक केली तेव्हा तो अल्पवयीन असल्याने बालन्यायालयीन कोठडीत होता तर दुसरा मात्र दहा महिन्यांपासून कारागृहातच होता. आरोपी मंगेश काळे यास जामिन मिळण्यासाठभ मंगळवारी अ‍ॅड.अश्‍विनी डोलारे यांनी न्या.सुधीर डोरले यांच्या न्यायासनापुढे जोरदार युक्तीवाद केल्यानंतर जामीन मंजूर करण्यात आला.

28 दिवसांनी झाला होता खुनाचा उलगडा
वर्दळीच्या भागातच ठाकूर यांचा खून झाल्याने पोलिस चक्रावले होते तर पोलिसांनी या भागातील सीसीटीव्ही तसेच मंडळांच्या पदाधिकार्‍यांची खोलवर विचासपूस केली होती तसेच मिळालेल्या माहितीच्या आधारे तब्बल 70 जणांचे जवाब नोंदवून 35 दुचाकी तपासल्या होत्या. अखेर पोलिसांच्या प्रयत्नांना यश आले होते तर आरोपी व मयतांमध्ये वाद व शिविगाळ झाल्याने आरोपींनी मयताच्या डोक्यात लाकडी ओंडके मारल्याचा आरोप होता.