भुसावळातील पोटनिवडणुकीसाठी राजकुमार खरात यांनी अर्ज केला दाखल

0

भुसावळ : पालिकेचे प्रभाग चार – अ चे भाजप नगरसेवक रवींद्र खरात यांच्या हत्याकांडानंतर रीक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक कार्यक्रम जाहिर झाला आहे. बुधवारपासून ऑनलाईन नामनिर्देशन पत्र भरण्यास सुरवात झाली असून 12 डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल केले जाणार आहेत. सोमवारी राजकुमार रवींद्र खरात यांनी निवडणूक निर्णय अधिकारी रामसिंग सूलाणे यांच्याकडे भाजप आणि अपक्ष म्हणून दोन उमेदवारी अर्ज दाखल केले. आतापर्यत फक्त दोनच उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे.

यांची होती उपस्थिती
भाजप नगरसेवक रविंद्र खरात यांच्या खूनानंतर प्रभाग 4 अ साठी निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक जाहिर केली आहे. बुधवारपासून नामनिर्देशन पत्र राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या वेबसाईटवर भरावे लागणार आहेत. यासाठी 12 डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. सोमवारी रवींद्र खरात यांचा मुलगा राजकुमार खरात याला सर्व आंबेडकर चळवळीतील सदस्यांनी पुढाकार घेत त्याचा उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी रामसिंग सूलाणे यांच्याकडे दाखल केला. यावेळी राजकुमार यांची आई रजनी खरात, रमेश मकासरे, राजू सूर्यवंशी, जगन सोनवणे, रवींद्र निकम, लक्ष्मण जाधव, नगरसेवक कीरण कोलते, रवींद्र सपकाळे, विनोद सोनवणे, नगरसेवक अमोल इंगळे, मुन्ना सोनवणे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी सुलाणे यांनी उमेदवारी अर्ज स्विकारला यावेळी सहायक अधिकारी करूणा डहाळे आणि पालिकेचे कर्मचारी उपस्थित होते.