भुसावळ : महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर शहरातील प्रभाग 20 व 21 मधील रस्ता कामांचा शुभारंभ भुसावळचे लोकप्रिय आमदार संजय सावकारे यांच्याहस्ते गुरुवारी सखीबाबा चौकात करण्यात आला. याप्रसंगी मुख्याधिकारी संदीप चिद्रवार, उपनगराध्यक्ष रमेश नागराणी, अजय नागराणी, शहराध्यक्ष परीक्षीत बर्हाटे, नगरसेवक युवराज लोणारी, महेंद्रसिंग (पिंटू) ठाकूर, राजेंद्र नाटकर, निकी बत्रा, गिरीश महाजन, सतीश सपकाळे तसेच प्रभागातील नागरीक उपस्थित होते.
40 वर्षानंतर उजळले रस्त्याचे भाग्य
तब्बल 40 वर्षानंतर या भागातील रस्त्याचे भाग्य उजळल्याने या भागातील नागरीकांनी समाधान व्यक्त केले.