भुसावळातील प्रभाग 22 मधील कामांसाठी राष्ट्रवादी आक्रमक

0

निविदांना मंजुरी न दिल्यास तीव्र आंदोलनाचा माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडेंचा इशारा

भुसावळ – शहरातील प्रभाग क्रमांक 22 मधील मंजूर निविदांना वर्क ऑर्डर द्यावी अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलचे अध्यक्ष व माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांनी दिला आहे. गत पंचवार्षिकमध्ये त्यावेळच्या प्रभाग क्रमांक दहा व आताच्या प्रभाग 22 मध्ये विविध विकासकामांना सभागृहात मंजुरी मिळाली तसेच जळगाव टाऊन प्लॅनिंग विभाग व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने तांत्रिक मंजुरी दिल्यानंतरही कामे होत नसल्याने नेमाडे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत आंदोलनाचा इशारा दिला आहे.