भुसावळातील प्राचार्य डॉ.मंगला साबद्रा यांचा पगार रोखावा

उच्च शिक्षण विभागाचे शिक्षण सहसंचालक कुंदन तायडे यांचे निवेदन

भुसावळ : भुसावळातील श्रीमती प.क.कोटेचा महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.मंगला साबद्रा यांची याचिका उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाने फेटाळल्यामुळे आता त्यांना पदावर राहण्याचा कोणताही कायदेशीर अधिकार नाही त्यामुळे त्यांचा पगार रोखण्यात यावा, अशी मागणी जळगाव येथील उच्च शिक्षण विभागाचे शिक्षण सहसंचालक यांच्याकडे भालोद येथील सामाजिक कार्यकर्ते कुंदन धर्मा तायडे यांनी पुराव्यासह निवेदन देऊन केली आहे.

पगारावरील खर्च वसुल करावा
वास्तविक विद्यापीठाने साबद्रा यांची मान्यता काढल्यामुळे त्यांनी या निर्णयाविरुद्ध औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती मात्र खंडपीठाने 30 ऑक्टोंबर रोजी त्यांची याचिका निकाली काढल्यामुळे आता त्या मान्यताप्राप्त प्राचार्य नसल्यामुळे व विद्यापीठाने संस्थेला योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिलेले होते मात्र संस्थेने कालावधी संपल्यानंतर सुध्दा जाणुन-बुजून कोणतीही कार्यवाही केलेली नाही. शिक्षण सहसंचालक यांनी संबंधित प्राचार्यांच्या स्वाक्षरीचा कोणताही पत्रव्यवहार स्वीकारू नये व त्यांचे वेतन अदा करण्यात येऊ नये, अशी मागणी निवेदनाद्वारे कुंदन धर्मा तायडे यांनी केली आहे. तायडे यांनी बेकायदेशीरपदे पदावर राहिलेल्या प्राचार्यांच्या पगाराचा खर्चसुद्धा वसूल करावा, अशी मागणी केली आहे. याबाबत आता विद्यापीठ , शिक्षण संचालक संचालक यांनी जर चालढकल केली तर आमरण उपोषणाला बसण्याचा इशाराही तायडे यांनी शिक्षण सहसंचालक प्रा.डॉ.संतोष चव्हाण यांना बोलून दाखवला आहे.