जळगाव : शहरातील प्रौढाशी सोशल मिडीयातून सलगी वाढवल्यानंतर महिलेने कपडे काढण्यास भाग पाडून त्याचा व्हिडिओ तयार केला व हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत खंडणी उकळल्याची धक्कादायक बाब समोर आली असून या प्रकरणी अज्ञाताविरोधात जळगाव सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
भुसावळातील वयोवृद्धाच्या तक्रारीनंतर गुन्हा
भुसावळ शहरातील एका भागातील 57 वर्षीय प्रौढाच्या तक्रारीनुसार त्यांना सोमवार. 18 एप्रिल रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास त्यांना अनोळखी नंबरवरून एका महिलेचा व्हॉटस्अॅपवर पहिल्यांना हाय पाठवण्यात आले. त्यानंतर फिर्यादीशी जवळीकता साधून व्हॉटसअॅपद्वारे व्हिडीओ कॉल करण्यात आला असताना समोरील महिलेने आपल्या अंगावरील कपडे काढून अश्लिल व्हिडीओ पाठविले. त्यानंतर ‘आप भी अपने कपडे उतारकर दिखाओ’ असे प्रौढास सांगितले व फिर्यादी यांनी देखील अंगावरील कपडे काढले मात्र यावेळी समोरील महिलेने फिर्यादीचे कपडे काढलेला व्हिडीओ रेकॉर्ड केला. त्यानंतर लागलीच फिर्यादीला रेकॉर्ड केलेला व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल करण्याची धमकी देत 10 हजार 580 रुपयांची खंडणी मागितली. फिर्यादीने घाबरून महिलेच्या खाते क्रमांकावर पैसे पाठविले. याबाबत तातडीने जळगाव सायबर पोलिसात धाव घेवून तक्रार दिल्यानंतर अज्ञात दोन मोबाईल धारकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक लिलाधर कानडे करीत आहे.