भुसावळ- शहरातील सुमनताई बर्हाटे पुर्व प्राथमीक विदया मंदीरातील चिमुकले बाल गोपालांनी आषाढी एकादशीनिमीत्त शनिवारी विठ्ठल रखुमाई व वारकरी संप्रदायाचा वेष परिधान करीत दिंडी काढली. यावेळी चिमुकल्यांनी अभंग म्हणून उपस्थितांना तल्लीन केले. अभंग आणि टाळांचा गजरात परीसर दणाणला. रॅलीत ज्ञानोबा विठ्ठल, ज्ञानराज माऊली, माऊली माऊली, पुंडलीक वरदे हरी विठ्ठल असा जयघोष करीत रॅली गायत्री नगर, महेश नगर, शिव कॉलनी,विकास कॉलनी, बालाजी नगरातील प्रदशिक्षणेनंतर शाळेत समारोप झाला. या वेळी रुपाली गाजरे यांनी दिंडीतील विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीचे महत्व पटवून सांगीतले. तसेच संस्थाध्यक्ष परिक्षित बर्हाटे यांनी मार्गदर्शन केले.याप्रसंगी मुख्याध्यापक सुधिर पाटील, रुपाली गाजरे, सुनिता पाटील, सुनिता पवार उपस्थित होते.
चौधरी प्राथमिक विद्या मंदीरातही दिंडी
शहरातील सुशिलाबाई छबिलदास चौधरी प्राथमिक विद्या मंदीरात शनिवारी दिंडी सोहळा झाला.दिंडी सोहळ्यात इयत्ता पहीली ते चौथीच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी वारकर्यांचा पोशाख परीधान केला होता.तसेच विठ्ठल रूख्मिणीचा सजीव देखावा दिंडीचे मुख्य आकर्षण ठरला. दिंडी सोहळ्यात शाळेचे मुख्याध्यापक डी.पी.बावीस्कर,पी.एस.सोनवणे,एस.बी.पिंजारी,एस.जी.नेमाडे यांचेसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व पालक उपस्थित होते.