भुसावळातील बियाणी पब्लिक स्कूलमधून चोरट्यांनी संगणक लांबवले

0

भुसावळ : शहरातील बियाणी पब्लीक स्कुलमधील संगणक लॅबमधील तीन संगणकासह प्रिंटर चोरट्यांनी लांबवल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. लॉकडाऊनच्या काळात शाळा बंद असल्याची संधी साधून चोरट्यांनी संगणक लॅबचे कुलूप तोडून ही चोरी केल्याचे सांगण्यात आले. याबाबत बाजारपेठ पोलिसात नोंद करण्यात आली. लॉक डाऊनचा फायदा घेउन चोरी झाल्याचा अंदाज शाळेच्या सचिव संगीता बियाणी यांनी वर्तवली. त्या म्हणाल्या की शाळेत या आधी कधीही चोरी झालेली नाही तर लॉक डाऊनचा फायदा घेऊन चोरट्यांनी चोरी केली असल्याचे त्या म्हणाल्या. दरम्यान, सीसीटीव्हीत चोरटे कैद झाल्याचे समजते. शहरातील वाढत्या चोर्‍या पाहता पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.