भुसावळ : जामनेर रोडवरील बियाणी मिलिटरी स्कूलच्या परीसरात बुधवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास आग लागल्याने यंत्रणेसह शाळा परीसरात मोठी धावपळ उडाली. भुसावळ नगरपालिकेच्या अग्निशमन यंत्रणेला आगीची माहिती देताच कर्मचार्यांनी बंबाद्वारे आग विझवली.
15 मिनिटात आगीवर नियंत्रण
परीसरात पडलेल्या झाडांचा पाला-पाचोळा पेटविल्याने आगीचे प्रमाण वाढले होते.
बियाणी मिलिटरी स्कूलच्या प्रवेशद्वाराजवळून ते आतमध्ये जाणार्या मार्गावर असलेल्या झाडांचा पाला पाचोळा तेथे पडलेला होता, तो जमा करून तेथील चार ते पाच मजूर तो पाला-पाचोळा पेटवित होते. यामुळे सुटलेल्या हवेमुळे आग काही वेळातच फैलली. यावेळी पालिकेच्या अग्निशमन केंद्राला माहिती कळवताच वसंत पाटील, डिगंबर येवले, दिनेश पुरोहित, विजय मनोरे आदी कर्मचार्यांनी धाव घेत 15 मिनिटातच आग आटोक्यात आणली.