भुसावळातील बेपत्ता तरुणाचा तापी पात्रात आढळला मृतदेह

0

भुसावळ- दोन दिवसांपूर्वी घरात भांडण झाल्याने संतापाच्या भरात घर सोडलेल्या 20 वर्षीय तरुणाचा तापी पात्रात मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. शेख जाफर शेख मोहम्मद (20, रेल्वे दवाखान्याजवळ) असे मृत तरुणाचे नाव आहे. दोन दिवसांपूर्वी त्याने संतापाच्या भरात घर सोडल्याने शहर पोलिसात हरवल्याची नोंद करण्यात आली होती तर त्याचा शोध सुरू असताना मंगळवारी दुपारी चार वाजेपूर्वी त्याचा मृतदेह तापी नदीपात्राच्या बंधार्‍यात आढळला. या तरुणाने आत्महत्या केली की अन्य कुठल्या कारणाने त्याचा मृत्यू झाला ? याबाबत माहिती कळू शकली नाही. शहर पोलिसात शेख सलीम शेख हाफिज (30) यांनी खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास हवालदार ईब्राहीम तडवी करीत आहेत.