भुसावळातील भंगार व्यावसायीकाला अटक

चोरीचे भांडे घेतल्याने बाजारपेठ पोलिसांची कारवाई : 30 हजार रुपये किंमतीचे भांडे जप्त

भुसावळ : शहरातील बाजारपेठेतील राजेंद्र शंकर मुळे (रा.सानेगुरुजी नगर, भुसावळ) यांच्या भांड्याच्या दुकानातून 7 ते 9 ऑगस्टदरम्यान चोरट्यांनी 47 हजार रुपये किंमतीचे भांडे चोरून नेले होते. बाजारपेठ पोलिसांनी या प्रकरणी आकाश उर्फ चॅम्पियन शाम इंगळे (21, रा.आठवडे बाजार, भुसावळ) व आसीफ शहा शरीफ शहा (32, रा.काझी प्लॉट, भुसावळ) यांना चोरी प्रकरणी 24 ऑगस्ट रोजी अटक करीत त्यांच्याकडून 16 हजार 120 रुपये किंमतीचा सामान जप्त केला होता. संशयीताने उर्वरीत भांडे भंगार व्यावसायीक शेख बिस्मिल्ला उर्फ बिसू शेख माली (40, रा.पंचशील नगर, भुसावळ) यास विकल्याची कबुली दिल्यानंतर माली यास शुक्रवारी अटक करण्यात आली व त्याच्या ताब्यातून 30 हजार रुपये किंमतीचे भांडे जप्त करण्यात आले.

यांनी आवळल्या संशयीताच्या मुसक्या
ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठ पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक मंगेश गोंटला, सहा.निरीक्षक हरीश भोये, हवालदार नेव्हिल बाटली, रवींद्र बिर्‍हाडे, नाईक विकास सातदिवे, रमण सुरळकर, कॉन्स्टेबल चेतन ढाकणे, प्रशांत परदेशी, सचिन चौधरी, ईश्वर भालेराव आदींनी केली. तपास हवालदार मिलिंद कंक करीत आहेत.