भुसावळातील भोई नगरच्या नागरीकांना वीज बिलात दिलासा

शिवसेनेचे प्रा.धीरज पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

भुसावळ : शहरातील भोई नगर परीरसरातील वीज ग्राहकांना चुकीची वीज देयके देण्यात आली. प्रतापराव रूपंचंद भोई यांच्या नावे असलेल्या बिलात मोठी तफावत होती. 78 युनिट वीज खर्च झाले असताना तीन हजार 467 युनिटचा वापर दाखविण्यात आला व 50 हजार 380 रुपयांचे वाढीव देयक ग्राहकाला मिळाले. दिनकर चौधरी यांना एकाच महिन्यात एक हजार 914 युनिट देण्यात आले ज्यामुळे देयकाची रक्कम 27 हजार 970 रुपये झाली. याबाबत त्यांनी तक्रार केली असता प्रथम दखल घेण्यात आली नाही. सहा ते सातवेळा हेलपाटे मारल्यानंतर, महावितरणच्या अधिकार्‍यांना तक्रारी करूनही समस्या सुटत नसल्याने शिवसेनेचे तालुका संघटक प्रा.धीरज पाटील यांच्याकडे नागरीकांनी समस्या मांडल्यानंतर पाठपुराव्यानंतर ग्राहकांना दिलासा मिळाला.

66 हजार 818 रुपयांची दुरुस्ती
प्रा.पाटील यांनी वीज मीटर तपासून देण्याचा आग्रह धरला. मीटरमध्ये दोष आहे, असे मीटर तपासल्यानंतर समोर आले. प्रताप भोई यांच्या देयकात 47 हजार 438 रुपये आणि दिनकर चौधरी यांच्या देयकात 19 हजार 680 रुपयांची अशी एकूण 66 हजार 818 रुपयांची दुरुस्ती करण्यात शिवसेनेचे प्रा.धीरज पाटील यांना यश आलक. परीसरातील नागरीकांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख समाधान महाजन, उपजिल्हा संघटक विलास मुळे, उपजिल्हाप्रमुख प्रा.उत्तम सुरवाडे आणि विधानसभा क्षेत्रप्रमुख संतोष सोनवणे यांचे आभार मानले. वीज देयक दुरुस्ती करण्यासाठी ग्राहकांना हेेलपाटे मारावे लागतात. यामुळे त्यांच्या रोजच्या कामावर-रोजगारावर परीणाम होतो. गोर-गरीब वस्तीतील सामान्य नागरीकांना अवास्तव रकमेची देयके देणे हे चुकीचे आहे. देयक दुरुस्ती दोन दिवसात होणे अपेक्षित असते. वीज बिल समस्या असल्यास नागरीकांनी संपर्क साधावा, असे आवाहन प्रा.पाटील यांनी केले आहे.