भुसावळातील भोळे महाविद्यालयात 3 रोजी राष्ट्रीय शोध परीषद

0

भुसावळ : शहरातील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात 3 जानेवारी 2020 रोजी ‘रिसेंट ट्रेंड्स अँड इनोव्हेशन इन केमिकल सायन्स 2020’ या विषयावर राष्ट्रीय संशोधन परीषद होत आहे. या परीषदेसाठी देशभरातून शोधनिबंध महाविद्यालयास प्राप्त होत आहेत. ग्रीन केमिस्ट्री ऑरगॅनिक, इन-ऑरगॅनिक, अनालिटीकल, पॉलिमर आणि फिजिकल केमिस्ट्री या रसायन शाखांच्या नियमित शाखांसोबत मेडिकल, इलेक्ट्रोकेमिस्ट्री या सहयोगी शाखा, न्यानोटेक्लोनोजी ही अद्यावत विकसीत झालेली शाखा मेटल आणि लोय विषयक आणि वेस्ट मॅनेजमेंट ह्या मानवीजीवनाशी निगडित, थीन आणि थिक फिल्म्स त्यांचे रासायनिक गुणधर्म तपासणीसाठी आवश्यक क्यारेक्टराईझेशन टेक्नीकल, लाईफ सायन्सेसमधील विविध विषय आणि पर्यावरणाशी संबधीत विविध संशोधनाच्या शाखामधील अद्यावत संशोधनाशी संबधीत शोधनिबंध महाविद्यालयास प्राप्त झाले आहेत.