भुसावळ : शहरातील प्रभाग क्रमांक आठमधील महात्मा फुले आरोग्य केंद्रावर बुधवार, 15 रोजी 260 शहरवासीयांना कोरोना लसीकरण करण्यात आले. कोविशील्ड 160 व कोवॅक्सीन 100 लसींचे डोस उपलब्ध झाल्याने पहिला व दुसरा डोस घेण्यासाठी बुधवारी सकाळपासूनच या केंद्रावर नागरीकांची मोठी गर्दी झाली होती. भुसावळातील नगरसेवक युवराज लोणारी, जनशक्तीचे संचालक यतीनदादा ढाके यांनी शिबिर सुरळीत पार पडण्यासाठी नियोजन केले. यावेळी माजी नगरसेवक वसंत पाटील यांच्यासह शहरातील 160 नागरीकांना कोरोना लसीचा पहिला व दुसरा डोस देण्यात आला. लसीकरणाकामी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.संदीप जैन, प्रमोद महाले, परीचारीका लता वानखेडे, कोमल मोरे, सुनीता चित्ते, नितीन पाटील, शिपाई प्रमोद चौधरी, रींकू ढाके, विशाल कोळी, सौरभ सपकाळे, सुरेंद्र बर्हाटे, मयूर चिरमाडे यांच्यासह आशा वर्कर यांनी सहकार्य केले.