भुसावळ ः पांडुरंग सदाशिव साने ऊर्फ साने गुरुजी हे मानवतावादी समाजसेवक, स्वातंत्र्य सैनिक, मराठी साहित्यिक व विचारवंतांची मंगळवार, 24 डिसेंबर रोजी असलेल्या 120 व्या जयंतीचे औचित्य साधून भुसावळ बाजार पेठ पोलिस स्टेशन समोर असलेल्या त्यांच्या स्मारकाची दुरवस्था झाल्याने शिवसेना पदाधिकार्यांनी स्वच्छता मोहिम राबवत स्मारकाला पुष्पहार अर्पण केला.
स्मारकाची केली स्वच्छता
भुसावळ शिवसेना शहर प्रमुख बबलू बर्हाटे, विभाग प्रमुख निखील बर्हाटे, उपविभाग प्रमुख सचिन चौधरी, शाखा प्रमुख अथर्व जोशी, हर्षल चौधरी, मनीष महाजन, अंकुश झांबरे, जयेश भंगाळे, मयूर ढाके, योगेश जैन, विशाल लोखंडे, नेहाल बोरोले यांनी स्व.साने गुरूजींच्या स्मारकाची स्वच्छता करीत माल्यार्पण केले. महापुरुषांची जयंती आणि पुण्यतिथीला स्मारकाची स्वच्छता करण्याचे कामसुद्धा नगरपालिका प्रशासनाने सोडले आहे. स्मारकांसाठी नगरपालिकेत कोट्यवधी रुपयांचा निधी पडून आहे, प्रशासन झोपेचे सोंग घेत असून कुंभकर्णाला सुद्धा लाजवेल अश्या झोपेत सत्ताधारी असून स्मारकांकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे अन्यथा शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रकांत पाटील, उपजिल्हा संघटक विलास मुळे, तालुका प्रमुख समाधान महाजन यांच्या नेतृत्वात शिवसेना व सर्व अंगीकृत संघटना पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आंदोलने छेडले जातील, असा इशारा शिवसेनेने दिला आहे.