भुसावळ : राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपूलाजवळ रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास मोटर सायकल चालकाने ब्रेक मारल्याने मागाहून आलेल्या कारची धडक बसल्याने मोटर सायकलवरील दोन्ही जखमी झाले. कारमधील महिला, लहान मुलांना मुका मार लागल्याचे सांगण्यात आले.
अचानक ब्रेक मारताच धडकली चारचाकी
राष्ट्रीय महामार्गावरील रेल्वेच्या उड्डान पूलावर रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास जळगावकडे जात असलेली मोटर सायकल (एमएच 19 सीएल 5488) या गाडीवरील चालकाने गतीरोधक आल्याने मोटर सायकलला ब्रेक मारल्याने मागाहून वेगात आलेल्या कारने (एमएच 06 एपी 6388) मोटर सायकलला धडक दिली, यात मोटर सायकलवरील दोन्ही जण खाली पडले. यात अमानुद्दिन अमीनोउद्दिन (51) व आशिकउद्दिन गयासुद्दिन (वय 54) (दोन्ही रा. ग्रीन पार्क, भुसावळ) हे जखमी झाले. त्यांना तत्काळ शहरातील खाजगी हॉस्पीटलमध्ये नेण्यात आले. एका जणाची मांडी फॅक्चर झाली असून दुसर्याच्या डोक्याला लागल्याचे सांगण्यात आले. असे हॉस्पीटलच्या सूत्रांनी सांगितले. अपघात झाल्यावर महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक ठप्प झाली होती. यावेळी शहर वाहतू क शाखेचे पोलिस कर्मचारी श्रीकृष्ण चाटे व महेमुद अली यांनी वाहतूक सुरळीत केली.
गतीरोधकांवर पांढरे पट्टे मारायची आवश्यकता
महामार्गावरून जात असलेल्या कार व मोटर सायकल याच्यात अपघात झाला तो गतीरोधकवरून गाडी उधळल्याने येथील गतीरोधकवर कुठल्या प्रकारचे पांढरे पट्टे मारलेले नाहीत, त्यामुळे वेगात येणार्या वाहनधारकांना गतीरोधक दिसत नाही, त्यामुळे महामार्गप्राधीकरण विभागाने गतीरोधकवर पांढरे पट्टे मारून भविष्यात होणारे अपघात टाळावेत, अशी मागणी होत आहे.
कार उधळली
गतीरोधकवरून कार उधल्याने कार थेट बाजूला असलेल्या रस्त्याच्या कडेवरून बाजूला पूलाचेकाम सुरू आहे तेथे जाऊन उभी राहीली. साधारण तीन ते पाच फुट उंच कार उडाली होती. गाडीतील भरत कोळी याच्या परिवारातील सदस्य घाबरून गेले. त्यांनाही मुका मार लागल्याचे कोळी यांनी सांगितले.