भुसावळातील मुकेश भालेरावची पोलिसांकडून कसून चौकशी

0

आगीनंतर पोलिसांनी घेतले नमूने : लवकरच घटनेचा होणार उलगडा

भुसावळ- शहरातील रेल्वेच्या पंधरा बंगला भागातील रेल्वे कर्मचारी मुकेश भालेराव यांच्या घरात घरात स्टोव्हचा भडका झाल्याने घराला आग लागून संसारोपयोगी साहित्य जळाल्याची घटना शनिवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास घडली होती तर या घटनेत भालेराव यांच्या आई प्रमिला भालेराव यांचा हातही भाजला होता. या घटनेत सुरुवातीला स्टोव्हचा भडका उडाल्याचे सांगण्यात आले असलेतरी परीसरातील रहिवाशांनी घरात रेल्वे वॅगनमधील पेट्रोलसह-डिझेलचा साठा असल्याची माहिती दिल्यानंतर बाजारपेठ पोलिसांनी मुकेशची रविवारी सकाळी कसून चौकशी केली. या चौकशीत त्याने अनेक गौप्यस्फोट केल्याचे समजते मात्र पोलिसांनी त्याबाबत अधिक माहिती देणे टाळले. निरीक्षक देविदास पवार म्हणाले की, संबंधिताची चौकशी करण्यात आली असून लवकरच अनेक बाबींचा उलगडा करू. घराचा पंचनामा करण्यात आला असून घरात सर्वत्र आढळलेल्या रॉकेलचे नमूनेही घेण्यात आले आहे. या नमून्यांचा अहवाल आल्यानंतरच नेमके घटनास्थळी काय होते? हे कळणार असल्याचे त्यांनी सांगितले.