भुसावळ- शहरातील टिंबर मार्केटमधील अरूणा हॉस्पीटलमध्ये उपचारादरम्यान मृत झालेल्या शीलाबाई शंकर वानखेडे ( 42) या महिलेच्या मृत्यू प्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. शवविच्छेदनानंतर या महिलेचा व्हिसेरा तपासणीसाठी राखून ठेवण्यात आला होता. या महिलेचा व्हिसेरा नाशिक येथे बुधवारी तपासणी साठी प्रयोग शाळेत पाठविण्यात आला. अरूणा हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल केलेल्या शीलाबाई वानखेडे या महिलेचा 13 जुलै रोजी रात्री 9.30 वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्यामुळे संतप्त झालेल्या नातेवाइॅकांनी हॉस्पीटलमध्ये गोंधळ घातला होता. महिलेच्या मृत्यू प्रकरणी हॉस्पीटलमधील कंपाऊंडर योगेश महाजन याने दिलेल्या फिर्यादीवरून आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. महिलेच्या विच्छेदनानंतर व्हिसेरा नाशिक येथे बुधवारी प्रयोग शाळेत तपासणीसाठी रवाना केला आहे. व्हिसेर्याच्या अहवालानंतर तपासाला दिशा ठरणार आहे. पोलिस उपनिरीक्षक अंनिस शेख तपास करीत आहे.