भुसावळ : नातेवाईवांना रेल्वे स्थानकावर आलेल्या भुसावळातील 58 वर्षीय प्रौढाचा दहा हजार रुपये किंमतीचा मोबाईल चोरट्यांनी रेल्वे स्थानकावरून लांबवला होता. 21 रोजी रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास ही घटना घडली होती. या प्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी सैय्यद आफताफ उर्फ अप्प्या सैय्यद अरमान (19, रा.भुसावळ व राजस्थान) यास अटक केली असून त्याच्याकडून चोरी केलेला मोबाईल जप्त करण्यात आला आहे. प्रवीणचंद्र भिकालाल वाणी (58, कस्तुरी नगर, भुसावळ) हे सोमवार, 21 रोजी रात्री नऊ वाजता नातेवाईकांना सोडण्यासाठी रेल्वे स्थानकावर आल्यानंतर प्लॅटफार्म तिकीट घेत असताना शर्टच्या खिशातून चोरट्याने मोबाईल लांबवला होता. पोलिस निरीक्षक विजय घेर्डे व रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक राधाकृष्ण मीना यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अजीत तडवी, खंडारे, बाबु मिर्झा तसेच रेल्वे सुरक्षा बलाचे एएसआय प्रल्हाद सिंग, वसंत महाजन, आरक्षक इम्रान खान आदींनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या. तपास हवालदार धनराज लुले करीत आहेत.