भुसावळातील मोबाईल चोरी प्रकरणी अल्पवयीन चोरटा जाळ्यात

भुसावळ : भुसावळ शहर पोलीस ठाणे हद्दीत धूम स्टाईल मोबाईल लांबवण्यात आल्याची घटना चार महिन्यांपूर्वी घडली होती. या प्रकरणी गुरनं.107/2021 भादंवि 392,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा रजा टॉवर भागातील मुस्लीम कॉलनीतील 15 वर्षीय अल्पवयीन बालकाने केल्याची माहिती भुसावळ बाजारपेठ पोलिसांना मिळाल्यानंतर त्यास चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले. संशयीताच्या ताब्यातून 30 हजार रुपये किंमतीची अ‍ॅक्टीव्हा दुचाकी जप्त करण्यात आली आहे. या दुचाकीबाबतही पोलिसांकडून कागदपत्रांची पडताळणी केली जात आहे.

यांनी केली कारवाई
ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ पोलीस निरीक्षक दिलीप भागवत, पोलीस निरीक्षक बाबासाहेब ठोबे, सहा.अनिल मोरे, सहा.निरीक्षक संदीप दुनगहू, शहर पोलीस ठाण्याचे सहा.फौजदार इकबाल पठाण, बाजारपेठचे नाईक विकास सातदिवे, रमण सुरळकर, उमाकांत पाटील, कॉन्स्टेबल ईश्वर भालेराव, प्रशांत परदेशी आदींनी केली.