भुसावळात मोबाईल शॉपी फोडणारा चोरटा पोलिसांच्या जाळ्यात

0

चोरी केलेले तीन मोबाईल जप्त : बाजारपेठ पोलिसांची कारवाई

भुसावळ : शहरातील बाजारपेठ पोलिस ठाण्यापासून काही अंतरावर असलेल्या जामनेर रोडवरील छत्रपती शिवाजी कॉम्प्लेक्समधील श्री साई मोबाईल शॉपी फोडून चोरट्याने दोन हजार 500 रुपयांचे तीन मोबाईल लांबवले होते. 7 रोजी मध्यरात्री ही घटना घडली होती तर चोरटा सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला होता. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी विशाल मधुकर धांडे (30, रा.विठ्ठल मंदिर वॉर्ड, भुसावळ) या चोरट्यास मॉडर्न रोडवरून अटक केली असून त्याच्या ताब्यातून चोरी केलेले तीन मोबाईल जप्त केले आहेत.

यांनी केली आरोपीला अटक
भुसावळचे पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड, बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक अनिल मोरे, सहाय्यक निरीक्षक संदीप परदेशी, रवींद्र बिर्‍हाडे, यासीन पिंजारी, रमण सुरळकर, महेश चौधरी, उमाकांत पाटील, तुषार पाटील, कृष्णा देशमुख, विकास सातदिवे, ईश्वर भालेराव, प्रशांत परदेशी आदींच्या पथकाने केली. तपास नाईक महेश चौधरी करीत आहेत.