नगरसेवक मुकेश पाटील यांची संकल्पना : निर्माल्यापासून खताची निर्मिती
भुसावळ- शहरातील प्रभाग क्रमांक सातचे नगरसेवक मुकेश पाटील यांच्या संकल्पनेतून श्री मोरेश्वर नगरातील रहिवाशांनी पर्यावरणपूरक गणरायाची स्थापना केली. शाडू मातीपासून निर्माण केलेली मूर्तीचे 11 व्या दिवशी मिरवणूक काढून कृत्रिम तळ्यात विसर्जन करण्यात आले तर प्रभागातील निर्माल्य नदीपात्रात न टाकता ते गोळा करण्यात आले असून त्यापासून खताची निर्मिती केली जाणार आहे. या उपक्रमासाठी नगरसेविका अनिता सपकाळे, सतीश सपकाळे यांचे सहकार्य लाभले.
निर्माल्यापासून होणार खत निर्मिती
मोरेश्वर नगरातील हनुमान मंदिर परीसरातच श्री विसर्जनासाठी कृत्रिम तळ्याची निर्मिती करण्यात आली तर 11 दिवसात जमा झालेल्या निर्माल्याचे संकलन करून त्यापासून खताची निर्मिती करण्यात येणार असल्याचे नगरसेवक मुकेश पाटील म्हणाले. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने श्री मोरेश्वर नगरवासीयांनी राबवलेल्या उपक्रमाचे शहरवासीयांमधून कौतुक करण्यात आले.