भुसावळातील युवकावर हल्ल्याप्रकरणी अनोळखीविरुद्ध गुन्हा

0

भुसावळ- शहरातील सोमाणी गार्डन परीसरात मंगळवारी सायंकाळी युवकाच्या डोक्यावर लाकडी दांड्यानेे वार केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी शहर पोलिसात अनोळखी आरोपीविरुद्ध भादंवि 324 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. रोशन नरेंद्र कोळी (वय 26, रा.जुना सातारा) असे जखमीचे नाव आहे. सोमानी गार्डनजवळ या युवकावर कुणीतरी अचानक येवून लाकडी दांड्याने हल्ला चढवत पळ काढला होता. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर 108 मधील डॉ.प्रीतेश चौधरी व चालक समाधान चौधरी यांनी घटनास्थळीध ाव घेत जखमीला तातडीने पालिका रुग्णालयात आणत त्याच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला गोदावरी रुग्णालयात हलवले होते. मंगळवारी रात्री पोलिस उपनिरीक्षक नाना सूर्यवंशी यांनी जखमीचा जबाब नोंदवत अनोळखी आरोपीविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला.