जागतिक नृत्य दिनाचे औचित्य साधून शहरवासीयांना दर्जेदार कार्यक्रमाची मेजवानी
भुसावळ- नुपूर कथ्थक डान्स अॅकेडमी व झुंझार लेवा समाज सांस्कृतिक मंडळाच्या संयुक्तपणे आयोजित तराना या शास्त्रीय नृत्याच्या कार्यक्रमास शहरवासीयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सोमवार, 29 एप्रिल रोजी शहरातील डॉ.बी.व्ही.खाचणे हॉलमध्ये सायंकाळी सात वाजता फैजपूर येथील सतपंथ मंदिराचे महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज व मान्यवरांच्या हस्ते
नटराज पुजन आणि दीपप्रज्वलन करण्यात आले. अध्यक्षस्थानी अरुण पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून भारत विकास परीरषदेचे देवगिरी प्रांताचे सचिव योगेश मांडे उपस्थित होते.
जलसंवर्धनावरही व्हावी जागृती -महामंडलेश्वर
महामंडलेश्वर जनार्दन महाराज यांनी आपल्या आशिर्वचनात सर्व क्षेत्रातील कलावंतांनी एकत्रीतपणे जलसंवर्धनासारख्या विषयावर आपल्या कलेच्या माध्यमातून जागृती करावी, असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रथम त्रितालमध्ये गुरुवंदना तोडे, तुकडे, आमद, त्रिपल्ली चक्रदार परन, चक्रदार परन, गणेशपरन, शिवकवित्त आणि पदसंचलन मैतेयी मालवीय, मंजिरी चिव्हाणे, प्रचिती कुळकर्णी, हिमांशु जावळे यांनी सादर केले. त्यांना तबल्यावर शिरीष जोशी व संवादिनीवर स्मिता कुळकर्णी तर पढंत चारु भालेराव यांनी साथसंगत केली. नंतर मान्यता गुप्ता, संस्कृती पाटील, रीद्धीमा चौधरी, दिती चिमणकर, अश्लेशा सपकाळे, लावण्या पाटील, चंद्रजा इंगळे, नुपूर भालेराव, अवनी धाडसे, रुत्वी भिरुड, हेमांगी पंडागरे यांनी बिहाग रागातील तराना सादर कैला. निलम धाडसे, पुनम गायकवाड, हर्षा गायकवाड, श्वेता ताकसांडे यांनी मुलतानी रागातील तराना सादर केला. दिव्यश्री तायडे हिने नृत्त्यशिक्षिका चारु भालेराव यांच्यासोबत राग जोगमधील तराना सादर केला. डिंपल गाढे, श्रावणी जोशी, प्राची महाजन यांनी जयजयावंती रागातील तराना सादर केला. रसिका कुळकर्णी, साक्षी कुळकर्णी, कल्याणी सपकाळे यांनी राग हींडोल एकतालमध्ये तराना सादर केला. नुपूर भालेराव हिने केदार रागातील तराना सादर करुन रसिकांची मने जिंकली. नियती राणे, उर्वशी कोळी यांनी त्रिताल सादर केला. मंजिरी चिव्हाणे , प्रचिती कुळकर्णी, मैत्री मालवीय, हिमांशु जावळे यांनी तराना मधून भैरवी रागातील जुगलबंदी सादर केली. मानसी राणे, अनुष्का फलटनकर, पुर्वा पाटील यांनी भैरवी रागातील तराना सादर केला. सर्व कलावंतांची रंगभुषा सीमा चिव्हाणे, दीपाली बबीलवार, ज्योत्स्ना कुळकर्णी यांनी केली तर वेशभुषा कांचन राणे, सुचिता राणे यांनी केली. कार्यक्रमाच्या ठिकाणी सुजाता इंगळे यांनी सुंदर रांगोळी काढुन वातावरण निर्मिती साधली. प्रास्ताविक नुपूर अॅकेडमीचे संचालक रमाकांत भालेराव तर सूत्रसंचालन राकेश भावसार यांनी केले.
यांनी घेतले परीश्रम
यशस्वितेसाठी प्रमोद नेमाडे, हिमांशु जावळे, किशोर राणे, उमेश जोशी, राजेश पाटील , गिरीश पाटील, शशिकांत गोरवाडकर, मदन चिव्हाणे,प्रांजल कुळकर्णी, साहील फालक, सपकाळे, शंभू गोडबोले, डॉ.खाचणे, सुभाष पाटील, प्रकाश फेगडे आदींनी परीश्रम घेतले.