भुसावळातील रस्ते होणार चकाचक

0

माजी मंत्र्यांच्या पाठपुराव्याने पाच कोटींचा निधी मंजूर

भुसावळ- शहरात अमृत योजनेमुळे खिळखिळे झालेल्या रस्त्यांची दुरवस्था पालटण्यासाठी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या विशेष प्रयत्नातून पालिकेला मंगळवारी पाच कोटी रुपयांचा निधी विशेष रस्ता अनुदानातून मिळाला आहे. याबाबतचे पत्र माजी मंत्री एकनाथ खडसे, नगराध्यक्ष रमण भोळे, मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर यांच्या उपस्थितीत मंत्रालयात देण्यात आले. यापूर्वी पालिकेला 12 कोटी रुपयांचे विशेष रस्ता अनुदान मिळाले आहे.

प्रमुख रस्ते लवकरच टाकणार कात
शहरातील प्रमुख मार्गांची आजघडीला अत्यंत दुरवस्था झाल्याने नागरीकांमध्ये तीव्र नाराजी आहे तर या पार्श्‍वभूमीवर यापूर्वीच पालिकेला 12 कोटींचा निधी मंजूर असून नव्याने पाच कोटी मिळाल्याने रस्ते लवकरच चकाचक होणार आहेत. दरम्यान या कामांची निविदा प्रक्रिया सध्या सुरू असल्याचे समजते.