भुसावळ- भुसावळातील रस्त्यांच्या कामांबाबत तातडीने तांत्रिक मंजुरी देण्यासंदर्भात भाजपा नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने कार्यकारी अभियंत्यांना साकडे घातले होते तर गुरुवारी मान्यता देण्याचे आश्वासन दिल्यानंतर तांत्रिक मंजुरी मिळाली असून आता ा कामाला जिल्हाधिकार्यांकडून प्रशासकीयमान्यता मिळाल्यानंतर निविदा प्रक्रिया झाल्यानंतर प्रत्यक्षाता कामांना सुरुवात होणार आहे.
नगरसेवकांच्या पुढाकाराने सुटला तिढा
शहरातील रस्ते अमृत योजनेमुळे रखडले तर पालिकेकडे निधी उपलब्ध असतानाही रस्त्यांची कामे करता येत नसल्याने महाजनादेश यात्रेत आमदार संजय सावकारेंनी मांडलेल्या तिढ्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रस्त्यांच्या कामांना विशेष बाब म्हणून मंजूरी दिली मात्र पालिकेने ठराव घेवून एमजीपीकडे तांत्रिक मंजूरीसाठी प्रकरण पाठवल्यानंतर तांत्रिक मंजुरी मिळत नसल्याने नागरीकांच्या रोषाला सामोरे जाणार्या भाजपा नगरसेवकांनी नगरसेवकांनी संबंधित अधिकार्यांची भेट घेवून हा तिढा सोडवला. गुरूवारी रस्त्यांच्या कामांना तांत्रिक मंजूरी मिळाली आहे.
लवकरच रस्ते टाकणार कात
एमजीपीकडून शहरातील 17 कोटींच्या रस्त्यांच्या कामाला तांत्रिक मंजूरी मिळाली असून प्रशासनाकडून जिल्हाधिकार्यांकडे प्रशासकिय मान्यतेसाठी प्रस्ताव पाठवला जाणार आहे. याबाबतची प्रक्रिया आता सुरू असून पाठपुरावा करून त्यासही मंजुरी मिळाल्यानंतर निविदा प्रक्रिया व त्यानंतर प्रत्यक्षात रस्त्यांच्या कामांना सुरुवात होईल, असे नगराध्यक्ष रमण भोळे म्हणाले.