भुसावळातील रेल्वेचे जीर्ण आऊटहाऊस तोडण्यास प्रारंभ

0

भुसावळ (प्रतिनिधी)- शहरातील रेल्वेच्या जागेवरील अतिक्रमित घरे, दुकाने व जीर्ण आऊट हाऊस तोडण्यास रेल्वे प्रशासनाने प्रारंभ केला आहे. रेल्वे विभागाने यापूर्वी पंधरा बंगला, आगवाली चाळ, चांदमारी चाळ, हद्दीवाली चाळ व आरपीडी रस्त्यावरील अतिक्रमित अनेक घरे व दुकाने तोडली आहे. उर्वरित अतिक्रमणे सुध्दा लवकरच काढण्यात येणार आहे. तत्पूर्वी जीर्ण झालेले आऊट हाऊस तोडण्यास रेल्वेने सुरूवात केली आहे. झोपडपट्टी देखील हटवली जाणार आहे.

नोटीसीनंतर कारवाईला सुरुवात
विभागीय रेल्वे व्यवस्थापक आर.के.यादव, वरीष्ठ विभागीय अभियंता (समन्वयक) राजेश, विभागीय अभियंता (विशेष कार्य) एम.एस.तोमर यांच्या मार्गदर्शनाखाली बारा बंगला भागाधील ईसीसी बँकेच्या शेजारील आऊट हाऊस तोडण्यासाठी दोन-तीन दिवसांपूर्वी इंजिनिअरींग विभागाने रहिवाशांच्या दरवाजांवर नोटीसा चिटकविलेल्या होत्या व गुरुवापासून जेसीबीने आऊट हाऊस तोडण्यास प्रारंभ झाला. रेल्वेने कुठलीही मुदत न देता ऐन पावसाळ्याच्या तोंडावर गरीबांचे संसार उघड्यावर आणल्याचेही रहिवाशांनी सांगितले. रेल्वेची जागा अतिक्रमणमुक्त होत आहे.