भुसावळ- शहरातील सोमनाथ मंदिर परीसरातील चांदमारी चाळीतील रहिवासी व रेल्वे कर्मचारी मो.सलीम इसराईल खान (57) यांचा जुन्या भांडणाच्या कारणातून नगरसेवक पूत्रासह तिघांनी गत आठवड्यातील गुरुवारी रात्री खून केला होता. पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी प्रत्यक्षदर्शींच्या उपस्थितीत त्यांची ओळख परेड केली होती तर पोलिसांना नायब तहसीलदारांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर आरोपींना गुरुवारी न्या.बवरे यांच्या न्यायासनापुढे हजर केले असता त्यांना 10 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. आरोपी प्रेमसागर रवींद्र खरात, भारत दिलीप वाकेकर राहुल धम्मपाल सुरवाडे (लाल जैन मंदिर, भुसावळ) यांच्याकडून पोलीस कोठडीत गुन्ह्यात वापरलेले हत्यार तसेच कपडे जप्त करण्यात येणार आहेत.