ऑनलाईन पेमेंटनंतरही मिळाली नाही दुचाकी : फसवणुकीचे प्रकार वाढले
भुसावळ : जलद व सुलभ व्यवहार म्हणून ऑनलाईन व्यवहाराकडे पाहिले जात असलेतरी या प्रकारात फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. रेल्वेतील कर्मचार्यादेखील अशाच प्रकार दुचाकी घेण्यासाठी एक लाख 14 हजार 600 रुपयांचा गंडा घालण्यात आला असून भुसावळ शहर पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
पेमेंटनंतरही मिळाली नाही दुचाकी
रेल्वे कर्मचारी तथा पी.ओ.एच. कॉलनीतील रहिवासी पवन कुमार वर्मा यांनी मोबाईलवरून होंडा कंपनीचे अॅक्टिवा दुचाकी विकत घेण्यासाठी मोबाईल पे या वॉलेटवर 7 ते 8 फेबु्रवारीदरम्यान पेमेंट केले मात्र गाडी ताब्यात न दिल्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी भुसावळ शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून शैलेश (पूर्ण नाव व गाव माहीत नाही) नामक व्यक्तीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास उपनिरीक्षक पेटकर करीत आहेत.