भुसावळ- बसस्थानक मार्गावरील रेल्वेच्या जुन्या वस्तूंच्या संग्रहालयात बुधवारी दुपारी डीआरएम आर.के.यादव यांच्या हस्ते मिनी थिएटरचे उद्घाटन करण्यात आले. या थिएटरमध्ये जुने पूल, ट्रॅक, स्टेशन, इंजिन तसेच डब्ब्यांचे संग्रहालयात येणार्या व्हिडिओ पाहता येणार आहेत.
यांची होती उपस्थिती
वरीष्ठ मंडळ यात्रिक अभियंता लक्ष्मीनारायण, वरीष्ठ इंजीनियरिंग अभियंता राजेश चिखले, मुख्य चिकित्सा अधिकारी सामंतराय, वरीष्ठ मंडळ अभियंता जी.के.लखेरा, वरीष्ठ मंडल संरक्षा अधिकारी एन.के.अग्रवाल, वरीष्ठ मंडळ विद्युत अभियंता (टीआरडी) प्रदीप ओक, वरीष्ठ मंडळ सिग्नल-दूरसंचार अभियंता निशांत द्रिवेदी, मंडळ वाणिज्य प्रबंधक बी.अरुणकुमार, स्टेशन अधीक्षक जी.आर.अय्यर व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.