भुसावळ- भुसावळातील लष्करी डेपोतील जवानाला ऑनलाईन लिंक पाठवून 30 हजारांचा गंडा घातल्याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मनीषकुमार सुभाषचंद्र (रा.चिन्दोडा तहसील खतोली, मुजफ्फरनगर, ह.मु.आरपीडी गेट, भुसावळ) या जवानाला 9 ते 12 मार्चदरम्यान 6289065079, 9064574596 व 8546995577 या क्रमांकावरून मोबाईल आल्यानंतर त्यांनी बँक स्टेट बँकेचे तपशील विचारत पाठवलेल्या लिंकवर क्लीक करण्यास सांगितल्यानंतर एका खात्यातून 20 हजार तर दुसर्या खात्यातून दहा हजारांची रक्कम 12 रोजी भामट्यांनी मोनेट बँकेद्वारे अन्य खात्यात वळती केली. पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार लक्ष्मण महाले तपास करीत आहेत.