छळ प्रकरणातील गुन्ह्यात आरोपीला अटक न करण्यासाठी मागितली होती 15 हजारांची लाच
भुसावळ- छळ प्रकरणातील गुन्ह्यात आरोपी असलेल्या महिलेला 15 हजारांची लाच मागणार्या बाजारपेठ पोलीस ठाण्यातील हवालदार लतीफ शेख यांना जळगाव एसीबीच्या पथकाने गुरुवारी सायंकाळी शहरातील जाम मोहल्ला भागात रंगेहाथ अटक केली होती. अटकेनंतर आरोपीला शुक्रवारी न्यायालयात हजर केल्यानंतर तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. सोमवारी कोठडी संपल्याने भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयात त्यास हजर केले असता आरोपीला जामिन न देण्याबाबत एसीबीतर्फे हरकत नोंदवण्यात आली. न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून आरोपीची 25 हजारांच्या जामिनावर मुक्तता करण्यात आली. तपास एसीबीचे पोलीस उपअधीक्षक गोपाळ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नीलेश लोधी करीत आहेत.